‘ए, डोळे मिट ना, एक गंमत आणलीये तुझ्यासाठी! पटकन ग, किती उशीर करतेस?’ उत्साहाचं एक भिरभिरं माझ्या पुढ्यात कित्येक दिवसांनी येऊन बोलत होतं. ‘अगं हो हो, जरा थांब ना! हातातलं काम पुरं होऊदेत!’ माझ्यातली कर्तव्यदक्ष गृहिणी बोललीच. पण भिरभिर्याला दम कुठला निघायला? तिनं मला ओढलं तिच्यापाशी! मी डोळे मिटून हात समोर केले. ते तिनं उलटे केले, काहीतरी लावलं अन् म्हणाली, ‘थोडंसं थांब हं. मग एक खोल श्वास घेऊन हा वास घे.’ मी तसंच केलं आणि आहा...! तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब पडताच माती मोहरुन जाते, गंधित होते! तोच हा वास ‘मृद्गंधा’चा! कुणीतरी तो वास बंदिस्त केला कुपीत आणि माझ्या सखीनं तो मला दिला तिच्या माझ्या नात्याच्या सुगंधित आठवणींसाठी! मृदगंधाचं अत्तर माझ्यासाठी ठेऊन सखी निघून गेली! माझ्या मनात मग दरवळायला लागली मातीच्या जातीच्या बाईची असंख्य रुपं!
माती! सृजनाचं लखलखीत रुप अनंत काळापासूनचं! आपल्या पोटात ती सामावून घेते अबोध अवस्थेतलं बीज! त्याच्या रुजण्यानं शहारते, मोहरते अन् मग फळते, फुलते! आपल्या पोटातून सृजनाच्या अगणित शक्यतांना जन्म देते! मातृसंस्कृतीच्या उदयाच्या काळातल्या स्त्रीनं मातीची ही रुपं पाहिली आणि शेतीचा शोध लावला. माती आणि आपल्यातलं साधर्म्य तिनं ओळखलं. सृजनाच्या आदिम सोहळ्याची ती तृप्त साक्षीदार बनली! शेती, त्यापाठोपाठ येणारी अवजारं, पशुपालन, शिवणकाम, विणकाम, कुंभारकाम, भांडी, अलंकार अशा अनेक गरजांच्या पोटी येणार्या कामांची, व्यवसायाची निर्माती बाई! बाईची सर्जनशीलता, तिच्यातला चिवटपणा, खंबीरपणा यासह अनेक गुणांनी घाबरवलंच पुरुषांना. बघता बघता त्यांनी मातृसत्ता डळमळीत केली आणि पुरुषसत्ता प्रस्थापित झाली. या सत्तेनं माती आणि बाईला आपल्या कब्जात केलं. बाईला मात्र माती कायमच जवळची राहिली! सृजनाची ही दोन्ही रुपं एकमेकांना सांभाळत राहिली!
पुढे मग स्वतंत्र, आत्मनिर्भर असणारी ती दुर्बल म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘त्या’च्या नजरेतून स्वत:ला जोखताना आपलं मूळच विसरुन गेली. निसर्गाच्या उत्सवांना साजरं करणारी ती कर्मकांडांमध्ये पार गुरफटून गेली. काळानं आपली पावलं पुढं नेली, ती पुन्हा आत्मनिर्भर बनायला लागली आणि सुरू झाली तिची तारेवरची कसरत! रुढी, परंपरा आणि तिच्यातल्या सृजनाची नवी नवी खुणावणारी क्षितिजं यात गोंधळून जायला लागली. खरंतर तिच्याआत सर्जनशीलतेचा केवढा मोठा खजिना दडलाय! फक्त तिनं स्वत:त डोकावून पाहायला हवंय!
नैमित्तिक उत्सवांच्या आनंदाला आता किनार असते दडपणाची, कधी कधी तर भीतीचीसुद्धा. प्रत्येक वेळेस आनंद साजरा करण्यासाठी कशाला हवेत उत्सवच? या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तिच्या अस्तित्वाचा उत्सव तिला साजरा करता आला पाहिजे, अगदी प्रत्येक क्षणी. कारण सृजनाच्या साम्राज्याची बाईच खरीखुरी अनभिषिक्त साम्राज्ञी आहे. ती घर मांडते, फुलवते, सजवते, जपते. भांड्यांना ओळख देते, घराला घरपण देते. अनेक कलांची निर्माती होते. नात्यांना अर्थ देते. बाहेरच्या जगात कर्तृत्वाला नवा आयाम देते. जगण्याच्या प्रत्येक क्षणांना नवनिर्मितीचं आभाळ देते. आपल्या पंखांखाली विसावलेल्या पाखरांना जोजवते, वाढवते. मायेचं अक्षय्य भांडार होते. ती आई होते. ती असतेच भरुन राहिलेली चराचरात आणि अवघे चराचरही तिच्यात!

ती नभात दिनरात
कधी वेल्हाळ जमिनीत
घुमे शिवाराचं गाणं
तिच्या ग सावळ्या देहात
कधी वेल्हाळ जमिनीत
घुमे शिवाराचं गाणं
तिच्या ग सावळ्या देहात
ती पानगळ ग्रीष्मात
कधी वसंत उत्सवात
उठे थरथर शिशिराची
तिच्या ग हळव्या मनात
कधी वसंत उत्सवात
उठे थरथर शिशिराची
तिच्या ग हळव्या मनात
ती सांजकेशरी ढगात
कधी काळोखल्या जलात
सृष्टी गोजिरे गुपित
तिच्या ग कुजबुजे कानात
कधी काळोखल्या जलात
सृष्टी गोजिरे गुपित
तिच्या ग कुजबुजे कानात
ती हिरव्या रानात
कधी गोजिर्या उन्हात
हसरा नाचरा ऋतूसाज
तिच्या ग रंगे रंगात!
कधी गोजिर्या उन्हात
हसरा नाचरा ऋतूसाज
तिच्या ग रंगे रंगात!
आपल्याकडचे सण, उत्सव ऋतुंच्या हातात हात घालून येतात. गणपती, गौरींच्या पाठोपाठ नवरात्र येते. फुलांच्या रांगोळीत माती विसावते, मातीच्या कुशीत धान्य बिलगतं आणि बघता बघता हिरवं चैतन्य तरारुन येतं. यावेळच्या नवरात्रात घटाच्या मातीला साक्षी ठेऊन आपण ‘ती’च्यातल्या नवनिर्मितीच्या शक्तीची तिला आठवण करूयात. स्वत:ला दुय्यम समजणार्या तिच्या अंतर्मनाला साद घालूयात. तिच्यातल्या सृजनाच्या असंख्य शक्यतांची तिला जाणीव करून देऊयात. यंदा एवढं नक्कीच करुयात!
- स्मिता पाटील

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें